Uncategorized
मानवी समूहांसह पर्यावरणातील प्रत्येक घटकाने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करावे

भिमराव परघरमोल
तेल्हारा प्रतिनिधी - (७ डिसे. २०२४)
समाजातील प्रत्येक मानवी समूहांसह पर्यावरणातील सजीव निर्जीव घटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे, असे प्रतिपादन भिमराव परघरमोल (लेखक, व्याख्याता, अभ्यासक फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा तेल्हारा जि. अकोला) यांनी केले.
सविस्तर वृत्त असे की, इर्विन चौक अमरावती येथे ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठ्या प्रमाणात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भिमराव परघरमोल यांचे व्याख्यान झाले. प्रसंगी विचार पिठावर प्रा जगदीश गोवर्धन (अध्यक्ष साची फाउंडेशन अमरावती) डॉ. प्रा. धीरजकुमार नजान (गोपाळराव खेडकर महाविद्यालय तेल्हारा) समाजभूषण राजाभाऊ गडलिंग, सुनील गजबे (आक्रमण संघटना) यांची प्रमुख उपस्थिती होती.
भिमराव परघरमोल आपल्या व्याख्यानात म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाच्या माध्यमातून महिला, शेतकरी, कामकरी, कष्टकरी, विद्यार्थी, मतदार आरक्षणधारी यांच्यावर उपकार तर आहेतच, परंतु सोबतच पर्यावरणातील नद्या, नाले, त्यातील गौण खनिज, डोंगरदऱ्या, प्राणी, पक्षी, झाडे-वेली यांच्यावरही प्रचंड प्रमाणात उपकार आहेत. म्हणून त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी या सर्वांनी अभिवादन करावे, असे ते म्हणाले.
अभिवादन सभेला मोठ्या प्रमाणात अनुयायांची उपस्थिती होती.



