बालविकास शाळेच्या दीक्षा अमर तायडे हिस राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : येथील बालविकास मंदिर प्राथमिक शाळा विद्यार्थी महाराष्ट्र कराटे असोसिएशन द्वारा आयोजित सहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत दीक्षा अमर तायडे हिस गोल्ड मेडल मिळाले आहे.
जिल्ह्यातील अनसिंग येथे आईसाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त दि.५ जानेवारी रोजी आयोजित सहावी आमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धा 2025 मध्ये शाळेतील चार विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तर एका विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल मिळाले. यामध्ये
दीक्षा अमर तायडे, प्राची नाईकवाडे , आदिती खिल्लारे श्रावणी भालेराव तर सिल्वर मेडल प्राप्त करणारी करुणा खरात या विजेत्या स्पर्धकांना शाळेचे मु.अ विठ्ठल भिसडे, क्रीडा शिक्षक गणेश इढोळे व कराटे प्रशिक्षक देवानंद वैद्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष ॲड.विजय जाधव साहेब, संस्थेचे सचिव, प्राचार्य, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, पालक वर्ग यांच्या वतीने करण्यात आले.



