Uncategorized

पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्माईलिंग स्टोन फाउंडेशनच्या वतीने महाआरोग्य व रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न

मुक्ताईनगर: पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्माईलिंग स्टोन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिरात तब्बल १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली असून नेत्ररोग तपासणी, रक्तदान, हृदयरोग तपासणी, अस्थमा तपासणी, अस्थिरोग तपासणी, आणि दंतचिकित्सेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

शिबिरात विशेषतः ५० रुग्णांनी रक्तदान केले, तर ९० रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ३८ रुग्णांना नेत्रशस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आले असून, या रुग्णांची शस्त्रक्रिया लवकरच स्माईलिंग स्टोन फाउंडेशनमार्फत केली जाणार आहे.

डोळ्यांच्या ऑपरेशनवर विशेष सवलत देण्यात आली, ज्याचा लाभ अनेक रुग्णांना मिळाला. या आरोग्य उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे.

हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रविणदादा पाचपांडे आणि स्माईलिंग स्टोन फाउंडेशनच्या अध्यक्षा सौं. नीता प्रविण पाचपांडे यांच्या संकल्पनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा, भन्साली ट्रेडर्स मुक्ताईनगर, मुक्ताई सिटी स्कॅन अँड डायग्नोस्टिक सेंटर मुक्ताईनगर, संजीवनी ब्लड बँक सेंटर फैजपूर, स्माईलिंग स्टोन फाउंडेशन मुक्ताईनगर आणि पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मुक्ताईनगर यांचे विशेष सहकार्य लाभले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button