‘कोल्हटकर ‘मधील विद्यार्थ्यांचा गौरव!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
P. D. दांडगे (जळगाव जामोद)
(जळगाव जामोद) ता.30: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत 2022-23 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेत कला-वाणिज्य विषयात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा शनिवार (ता 30) सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण डाबरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. सतीश नेवे हे होते. जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी सरस्वती देवी आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. दीपप्रज्वलाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर निकिता गुडे या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती 2022-23 च्या परीक्षेत वाणिज्य व कलाश शाखेतून विविध विषयांमध्ये महाविद्यालयातून सार्वजनिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यात चैताली कुठे, किरण कवडकर, निकिता सोनवणे, सरिता धामोडे, राधा ठाकरे, वैष्णवी सुरपाठणे, वैष्णवी धर्मे, वैष्णवी भोपळे, रोशनी वावगे, आरती दामोदर, नीलू मोरे, अंकिता पुसे, काजल घाटे, सपना भालतडक, कीर्ती दाभाडे, वैष्णवी तायडे या या विद्यार्थिनींचा समावेश होता. प्राचार्य डॉ.प्रवीण डाबरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.✍



