अयोध्याधाम मध्ये सुंदरकांडचे आयोजन अभिनास्पद आणि ऐतिहासिक- राधेश्याम चांडक

मलकापूर प्रतिनिधी :-
सद्भावना सेवा समिती बुलढाणा द्वारा दहा दिवसीय दिव्य संकल्प स्पेशल रेल्वे यात्रा दिनांक 8 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत मथुरा, वृंदावन, अयोध्या, वाराणसी, गंगासागर, जगन्नाथपुरी, व परत अकोला आयोजित केली आहे .दिनांक 12 नोव्हेंबरला परमहंस श्री रामदास सेवा संस्थान ट्रस्ट श्री राममहल वैदेही भवन जानकी घाट श्री आयोध्याधाम या ठिकाणी विदर्भ मीरा संत सु श्री अलका श्रीजी यांचे सुंदरकांड सद्भावना सेवा समिती बुलढाणा च्या इतिहासातील अभिमानास्पद बाब आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन राधेश्याम चांडक यांनी काढले .याप्रसंगी डॉ. सुकेश झंवर सौ.कोमल झंवर सौ पुष्पादेवी चांडक, अनंताभाऊ देशपांडे व अनेक मान्यवर उपस्थित होते. ७५० भक्तांचा समावेश असलेली यात्रा मथुरा, वृंदावन, करून अयोध्याला आली . श्रीराम दर्शन, हनुमानगढी, नंदिग्राम दर्शन करून दुपारी ठीक ३ वा. सुंदरकांड पठण झाले. भाईजींनी सु श्री अलकाश्रीजी यांचे स्वागत केले. संत सुश्री अलकाश्रीजी यांनी सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, चंपालाल शर्मा , प्रकाशचंद्र पाठक , तिलोकचंद चांडक, सुरेश गट्टानी ,उमेश मुंदडा, सुभाष दर्डा ,यांचा सन्मान केला. बुकिंग करणारे डॉ परमेश्वर लढ्ढा डॉ.मनमोहन मर्दा ,गोपाल राठी, संतोष महेंद्र, घनश्याम बागडी, सुशील सारडा, संदीप केला, अशोक राठी, हरिश मानधना, संतोष गुडगिला, भोजन समितीचे भूपेंद्र भट, आवास समितीचे शिवा आवटे, विशेष सहयोगी डॉ सुकेश झंवर, कमल मोहता यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला. सुंदरकांडचे यजमान घनश्याम बागडी, यवतमाळ , नारायणदास, रामेश्वर ,दिलीप कुमार राठी ,राठी परिवार तळेगाव, प्रसादी यजमान पूनमचंद, पुरुषोत्तम, श्रावणकुमार मालू ,यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच मनमोहन शर्मा व सोनल शर्मा यांचा लग्नाच्या वाढदिवसी सन्मान केला. डॉ नंदलाल राठी नागपूर , वयोवृद्ध असूनही यात्रेकरूंना निशुल्क आरोग्य सेवा दिली. यांचा देखील सन्मान करण्यात आला .
सुश्री अलकाश्रीजी यांनी बांसी राजस्थान येथे सद्गुरू श्री सितारामदास बाबा यांच्या जन्म गावी भव्य मंदिर व गौशाळा सुरू केली, या गौशाळेला सद्भावना सेवा समितीतर्फे पाच लाख रुपयांची मदत देण्याची समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी टाळ्यांच्या गजरात घोषित केले. कार्यक्रमाचे संचालन मनमोहन मर्दा नागपूर व आभार प्रदर्शन संदीप केला यांनी केले.



