प्रहार जनशक्ती पक्ष व लोकाजागर मंच च्या वतीने तेल्हारा….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे
तेल्हारा :- हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ दि , 1मे 2023 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला असून ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात दि 1 मे ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
प्रहार जनशक्ती पक्ष व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या लोकजागर मंच च्या वतीने दि 5 जून 2023 ला तेल्हारा बसस्थानक परिसरात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. सोबतच बस्थानक परिसरात माती टाकणे ,परिसरातील काटेरी झुडपे काढने सुरू आहे . असल्याचे अनिलभाऊ गावंडे यांनी सांगितले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ गावंडे, मिथुन शर्मा आगर व्यावस्थापक , वाहतूक निरीक्षक रोहित इंगळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मुकेश बिहाडे, लोकजागर मंच चे तालुकाध्यक्ष अमोल जवंजाळ, दिलीप पिवाल ,विलास बेलाडकर, विक्की मल्ल शहर अध्यक्ष प्रहार, भैय्या देशमुख, युवक शहर प्रमुख, अंकित शेळके, युवक जिल्हा महासचिव प्रहार, रवी ताथोड, वेदुराज डीक्कर, श्याम गावंडे , लीलाधर राठी , गोपाल जळमकर योगेश पांडे, वैभव ठाकरे, राजेश खंडेराव विजय गवई, रा, प, कर्मचारी व लोकजागर मंच ,प्रहार जनशक्ती पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



