15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )
नगरपरिषद शाळा क्रमांक दोन ( मराठी माध्यम) या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे त्यानिमित्त पहिली दुसरी तिसरी चौथी मुलांचे मनोगत घेतले असता मराठी माध्यम ची शाळा असल्यावरही इंग्रजीमध्ये मुलांनी भाषणे दिले आहेत. आणि ही बाब खुपच कौतुकास्पद आहे .
आजच्या परिस्थितीमध्ये सरकारी शाळा वाचवणे देशहिताचे व लोक हिताचे अत्यंत महत्त्वाचे कार्य झालेले आहे मी स्वतः या शाळेकडे बारकाव्याने अनेक वर्षापासून लक्ष देत असून या शाळेतील शिक्षक अत्यंत उत्तमरीत्या शिक्षण हे देत आहेत व राबविल्या जात आहे त्याचप्रमाणे या शाळेमध्ये डेक्स बेंच प्रोजेक्टर इत्यादी उपलब्ध करून व वेळोवेळी लक्ष देऊन शाळेची प्रगती साधल्या जात आहे . आपण सर्वानी जर आप आपल्या गावातील सरकारी शाळेकडे देश हिताच्या व मानवहित्याच्या दृष्टीने विचार करून सहकार्य केले तर निश्चित सरकारी शाळांना सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही.
……… मित्रांनो आजच्या या परिस्थितीमध्ये गरिबांच्या मुलांना दहावी बारावीच्या वर शिक्षण घेणे खूप कठीण झालेले आहे ट्युशन फी दोन लाख तीन लाख अशाप्रकारे असल्या कारणामुळे गरिबांची मुले अशिक्षित राहायला जात आहेत सर्वांनी जागृत होण्याची आवश्यकता आहे✌👍



