प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तेल्हारा येथे दीपावली निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे
प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तेल्हारा येथे रविवारी सकाळी दहा वाजता दिवाळीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ब्रह्मकुमारीज सेवा केंद्र तेल्हारा च्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉक्टर सदाफळे डॉक्टर अंजलीताई सदाफळे व डॉक्टर विजयजी गोमासे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्रह्मकुमारी स्नेहल दीदी यांनी उपस्थित मान्यवरांचे व ज्ञानार्थींचे स्वागत केले.ब्रह्माकुमारी प्रमिला दीदींनी उपस्थिताना दीपावली सणाचे मनुष्य जीवनातील अध्यात्मिक महत्व सांगताना दीपावली म्हणजे आपल्या आत्मिक ज्ञानाचा दीप प्रज्वलीत करून इतरांना ही ज्ञानदान करण्यासाठी म्हणजे सर्वाना ज्ञान रुपी प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा उत्सव आहे. ब्रह्माकुमारीज सातत्याने मनुष्य आत्म्याना अध्यात्मिक ज्ञान देऊन अनेक ज्ञानी दीपाची माला तयार करीत आहे हे सर्व दीपक सतयुगात प्रज्वलीत होऊन खरी दीपमाला स्वयं भुतलावर येऊन करीत असल्याचे म्हटले. प्रमिला दीदींनी सर्व मान्यवरसह उत्सावाला उपस्थित राहलेल्या सर्व भाऊ बहिणींना दीपावलीच्या शुभेच्छा देत सर्वांना विशेष धन्यवाद दिले. कार्यक्रमात काही बालकानी अतिशय मनमोहक नृत्य सादर करून उपस्थितीतांचा आनंद द्विगुणित केला. कार्यकर्माच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी स्नेहल दिदी, ब्रह्माकुमार श्याम भाई सह ज्ञानार्थी भाऊ बहिणींचे महत्वपूर्ण सहकार्य मिळाले.



