डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना टिफिन बॉक्स वाटप

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवणारे संसदरत्न खासदार डॉ. अमोलजी कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच गौरी-गणपती आगमनाच्या औचित्याने सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार मंगेश तिडके व शिवशंभू प्रतिष्ठान यांच्या वतीने महिलांना टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले.
बालाजी नगर येथे आयोजित या सामाजिक उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सणासुदीच्या काळात महिलांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमासाठी रुद्र काळ गणेश मित्र मंडळ, बालाजी नगर यांचे विशेष सहकार्य लाभले. सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा केल्याबद्दल उपस्थित नागरिक व महिलांनी आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी परिसरातील महिला, नागरिक, कार्यकर्ते व गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते



