Uncategorized

राहुरी तालुक्यातील मानोरी या गावांमध्ये एका बारा वर्षीय मुलीचा पतंग उडवताना विहिरीत पडून दुर्दैव मृत्यू

राहुरी तालुक्यातील मानोरी गाव परिसरात एका १२ वर्षीय मुलीचा पतंग उडवताना विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी सकाळच्या दरम्यान घडली नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत खिळे वस्ती रोड परिसर येथे राहत आहे. याच कुटुंबातील बीनिता विष्णु थापा ही १२ वर्षाची मुलगी पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आज दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजून ३० वाजेच्या दरम्यान ती मुलगी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवीत होती. पतंग उडवीत असताना ती मुलगी तिथे असलेल्या एका विहिरीत पडली. आणि पाण्यात बुडू लागली तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला त्यावेळी परिसरातील असणारे नागरिक सर्जेराव जाधव, तुषार बाचकर, यांनी ताबडतोब धाव घेऊन विहिरीत उड्या मारल्या आणि पाण्यात बुडलेल्या मुलीचा शोध घेतला. त्यानंतर मुलीला दोरीने बांधून पाण्यातून बाहेर काढण्यात आले. व तिथे असणाऱ्या नागरिकांनी रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतले व रुग्णवाहिका चालकांनी तिला तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारपूर्वीच मयत घोषित केले. यावेळी मयत बीनिता या मुलीच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात खूप मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे मानोरी परिसरात व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

राहुरी प्रतिनिधी: दत्ता जोगदंड

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button