क्राईम

पोलीसा कडून जिल्हयात विधानसभा निवडणुक व सण उत्सव संबंधाने 107 गुन्हेगारांवर कारवाई.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

 वाशिम : - पंधरावी विधानसभा निवडणुक 2024  सोबतच दिवाळीच्या उत्सवात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन म्हणून  विविध १०७ गुन्हेगारांवर  कडक कारवाई करण्यात आली आहे..
  त्यानुषंगाने तसेच मालमत्ते विरुध्द घडणाऱ्या गुन्हयांस प्रतिबंध होणकरीता व खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणणे अत्यंत आवश्यक असल्याने

दिनांक 29/10/2024 ते 3/11/2024 पर्यत दिवाळी सण साजरा होत असल्याने तसेच सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2024 चे आचार संहिता पालन तसेच मालमत्ता विरुध्द घडणाऱ्या गुन्हयांस प्रतिबंध होणकरीता व खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणणे अत्यंत आवश्यक असल्याने संपुर्ण वाशिम जिल्हयात दिनांक 26/10/24 चे 23/00 वा पासुन ते दिनांक 27/10/2024 चे 05/00 वा पर्यत पोलीस अधिक्षक वाशिम अनुज तारे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड यांचे मार्गदर्शनाखाली कोंबीग गस्त व नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते.कोबींग गस्त व नाकाबंदी करीता वाशिम जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा मिळुन 34 अधिकारी व 128 अंमलदार नेमण्यात आले आहेत.
संशयित परीसर कोबींग गस्त दरम्यान आर्म ॲक्टच्या 5 केसेस करुन 5 आरोपी जेरबंद करण्यात आले. रेकॉर्ड वरील 50 निगरानी बदमाश चेक करण्यात आले. 31 गुन्हेगारी बेडे व झोपडपट्याही चेक करण्यात आल्या. मालमत्ता व शरीक इजा विरुध्द गुन्हे करणारे रेकॉर्ड वरील 42 गुन्हेगार यांना तपासले मागिल दोन वर्षापासुन फरार/पाहीजे असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद करण्यात आले. मोहीमे दरम्यान 21 BW/NBW/स्टँडींग वारंटची बजावणी करुन अटक करण्यात आली. जिल्हयातील 73 हॉटेल/धाबे/लॉज चेक करण्यात आले. रात्रीचे वेळी गुन्हा करण्याचे हेतुने फिरत असलेल्या 2 इसमांवर कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र दारुबंदी कायदयानुसार 25 केसेस करण्यात येऊन 25 आरोपीकडुन 2,35,060/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्र जुगार कायदया अंतर्गत 4 केसेस करण्यात येऊन 12 आरोपीकडुन 86,180/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच नाकाबंदी दरम्यान 465 वाहनांची कसुन तपासणी करुन 30 वाहनांवर मोटार वाहन कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button