बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शिवशंभो ग्रुप व रोटरी क्लब खामगाव ने केला जनुना तलाव चा काया पालट…. तसेच उद्याला

नोटरी क्लब खामगाव द्वारे, जनुना तलाव परिक्रमा चे आयोजन…… जीडी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

रोटरी क्लब खामगांवद्वारे “रोटरी जनुना तलाव परिक्रमा ”

खामगांववासियांना चांगलेच स्मरणात असेल की आजच्या 5 वर्षांपूर्वी अत्यल्प पावसामुळे जनुना तलाव हा त्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पूर्णपणे सुकला होता. त्यामुळे त्या परिसरातील भूजल पातळी तर खालावलीच होती सोबतच जलचर जीवसृष्टीचे देखील अपरिमित नुकसान झाले होते. परंतु रोटरी क्लब खामगांवने ही निसर्गाने दिलेली एक संधी समजून लोकवर्गणीद्वारे या तलावातील शेकडो टन गाळ उपसून काढला होता आणि तो गाळ नजीकच्या शेतक-यांना मोफत उपलब्ध करून दिला होता. म्हणजे तलावाच्या खोलीकरणासोबतच शेत जमिनींचे पुनर्जिवित करण्याचे कार्य रोटरीच्या हातून त्यावेळेस घडले होते. सोबतच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे मागील 4 वर्षांपासून टोटीने इतर काही निसर्गप्रेमी मंडळांच्या साहाय्याने या क्षेत्रात झाडे झुडपे व जनोपयोगी वृक्ष लागवडीचे कार्य हाती घेतले आणि त्याचाच परिणाम म्हणून आज हे क्षेत्र अगदी उन्हाळ्यातसुद्धा हिरवेगार दिसते आणि या परिसरात उन्हाचा प्रकोप कमी असून खूप थंडावा जाणवतो. प्राण्यांच्या आणि पक्षांच्या गुंजारवाने हा परिसर चैतन्यमय वाटतो. तसेच शिवशंभो ग्रुप यांनी सुद्धा जनुना तलावा साठी खूप मोठे मुलाचे योगदान दिले आहे त्यामध्ये हजारो लाखो झाडे लावून त्यामधील जगलेले झाडे त्यांची देखभाल त्यांचे संगोपन केले. त्यांची देखभाल या ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी केली आणि अद्याप पर्यंत दैनंदिन दिवसांमध्ये या वृक्षांची देखभाल सदरील शंभो ग्रुप करीत आहे परंतु तलावाच्या भिंतीला लागून जे पाईपलाईन झालेली आहे ती एक वर्षापासून लिखित झालेली आहे संबंधित नगरपरिषद ला वारंवार तक्रार देऊनही अद्याप पर्यंत त्यांनी कोणत्याच प्रकारची चौकशी केली नाही. तरी त्यांनी लिकेज झालेली पाईप लाईन मधून येणारे पाणी हे बंद करावे अशी नागरिकांची मागणी होत आहे…..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button