बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सिनगाव जहागिर येथे बकरीला पाला आणायला गेलेल्या 60 वर्षीय मजुरावर कुऱ्हाडीने हल्ला; एक जखमी, गुन्हा दाखल,आरोपी फरार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ;–शंकर शिवरकर

देऊळगाव राजा (प्रतिनिधी): बकरीला पाला आणण्यासाठी शेतात गेलेल्या एका 60 वर्षीय मजुरावर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागिर शिवारात घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कचरुबा रामराव सरोदे, वय 60 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. सिनगाव जहागिर, ता. देऊळगाव राजा हे दि. 02/07/2026 रोजी सकाळी 09:00 वाजता बकरीसाठी पाला आणण्यासाठी जितमल पठाडे यांच्या शेताजवळ, सिनगाव शिवारात गेले होते. त्याचवेळी गावातीलच आरोपी पांडुरंग धारे, रा. सिनगाव जहांगीर हातात कुऱ्हाड घेऊन तेथे आला. कोणतेही कारण नसताना आरोपीने फिर्यादींशी वाद न घालता थेट त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस, कपाळावर व पाठीवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात कचरुबा सरोदे गंभीर जखमी झाले असता जखमींना तातडीने उपचारासाठी परिनीका हॉस्पिटल, जालना येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी दिलेल्या जबाबावरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दि. 04/07/2026 रोजी सायंकाळी 4:44 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला.
या प्रकरणी कायमी अप नं. 305/2026, कलम 118(2) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 118(2) BNS हे गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे या स्वरूपाचे आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी साहेब यांच्या आदेशानुसार बिट पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे हे करीत आहेत. गुन्हा दाखल करणारे अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन काकड आहेत. या घटनेनंतर आरोपी पांडुरंग धारे हा फरार झाला असून. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे सिनगाव जहागिर गावात एकच खळबळ उडाली आहे. शेतात कामाला जाणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button