
प्रकल्पग्रस्तांचा संघटीत संघर्ष असल्याशिवाय न्याय मिळनार नाही
स्टार भारत लाईव
तालुका प्रतीनिधी
अनिल मुंढे
खामगाव
मनोज चव्हाण….
गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्त आपल्या न्याय व हक्कासाठी संघर्ष करीत असून.सरकारचे मात्र प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे पुर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येते.ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून धरणं ऊभी करण्यासाठी आपले उपजिविकेचे एकमेव साधन असलेल्या जमीनी घरे.ईत्यादी सहजतेने देऊन मदतच केली अशा सर्व जिवांचा पोशिंदा असलेला शेतकरी.सरकारी व्यवस्थेने देशोधडीला लावला असून आजपर्यंत अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी धरणावरच आत्महत्या करून आपले जिवन संपवले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव, ज्ञानगंगा,चौंडी, इस्लामपूर,नळगंगा, गारडगाव,ढोरपगाव,
खडकपूर्णा,ईत्यादी प्रकल्पा अंतर्गत गोरगरीब शेतकऱ्यांना धाकधडप करून१८९४ चा भूसंपादन कायदा अस्तित्वात असताना ६ जून २००६ ला एक सरळ वाटाघाटी सारखा गोंडस शब्द वापरून अत्यंत कवडीमोल दराने म्हणजेच ३९ हजार रुपये प्रति एकरा प्रमाणे लाखमोलाच्या जमीनी शेतकऱ्यांकडून थेट सरळ खरेदी करुन घेतल्या व शेतकऱ्यांचे न्यायालयात जाण्याचे संवैधानिक अधिकार सुध्दा हिरावून घेतले.शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांची फसवणूक होत असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी झोपले होते का ? असा प्रश्न मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलताना मनोजभाऊ चव्हाण यांनी केला.नुकतीच दिनांक ५ सप्टेंबर रोजी नांदूरा येथील पांडव मंगल कार्यालयात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना जिल्हा बुलढाण्याचे वतीने प्रकल्पग्रस्त मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील शेकडो प्रकल्पग्रस्त मेळाव्याला उपस्थित होते. मनोज चव्हाण यांनी पुढे बोलताना सांगितले की. एक धरण एक या तत्त्वाचा सरकारला विसर पडला असून एकाच धरणावर ४.४ प्रकारचे कायदे वापरल्या जात असून.१८९४ भूसंपादन कायदा, सरळ खरेदीचा जि.आर,महाराष्ट्र पुनर्वसन कायदा १९९९,भूसंपादन/पुनर्वसन/पुनरस्थापना अधिनियम २०१३ अशा प्रकारे कायद्यांचा खेळ खेडून सरकारी यंत्रणेने प्रकल्पग्रस्तांची अक्षरशः लुट चालवली असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून प्रकल्पग्रस्तांचा संघटीत संघर्ष असल्याशिवाय प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार नाही.त्यामुळे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना जागृत करून त्यांच्या न्याय व हक्कासाठी तिव्र लढा उभारला जात आहे.जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील समस्यां निकाली काढण्यासाठी विभागीय आयुक्त अमरावती यांना निवेदन दिले असून लवकरच त्या संदर्भात बैठक लागणार असल्याचे यावेळी संघटनेचे संघटक सुनिल भाऊ घटाळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी मंचावर जिल्हा प्रमुख नरेंद्र भाऊ पांडव,विदर्भ प्रसिद्धी प्रमुख अनिलजी मुंडे, राजूभाऊ लोनकर, संजय गिद,बळीरामजी काळे अरुण मुरुख,रामरावजी भारसाखळे,सतिश पांडव, प्रभाकर बगे,भास्कर वानखडे,बाळू वसतकार,पुरुषोत्तम पांडव, किशन वटपाळ, प्रविण मुन्ना भाऊ बोचरे विठ्ठल बाचरे अनंता वाकुडकार भागवत गायगोळ चिपडे ,राहूल वटपाळ ,रमेश पांडव,सागर तायडे,श्री.बोरशे,ज्ञानेश्वर जूणारे,ईत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



