जळगावा जिल्हासामाजिक

जयसिंग वाघ ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार ‘ ने सन्मानित

जळगाव जिल्हा प्रतिनिधी


………………………………………………………
जळगाव :- येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा निर्भिड वक्त्ये जयसिंग वाघ यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ , नागपूर तर्फे ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार ‘ दिनांक ३० मार्च रोजी नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन (मधुरम) सभागृहात आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करून सन्मानित करण्यात आले .
या प्रसंगी वाघ यांना बुके , सन्मानचिन्ह , सन्मानपत्र कुलगुरू डॉ. प्रकाश करमाडकर ( त्रिपुरा ) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य , संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. राजेश गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे होते . आर्यवृत्त आंतराराष्ट्रीय विद्यापीठ त्रिपुरा चे कुलगुरू डॉ. प्रकाश करमाडकर , नाटककार डॉ. सुनील रामटेके , डॉ. विजय शेगोकार विशेष कार्य अधिकारी , मंत्रालय , मुंबई डॉ. विद्याधर बनसोडे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी ‘ दीक्षा भूमी ऊर्जा भूमी ‘ हे नाटक , ‘ उजळली धम्मज्योत भीम स्वरांची ‘ हा गीत गायन कार्यक्रम , ऊर्जागीत अश्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती मोठ्यासंख्येने हजर होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल काळबांडे, प्रास्ताविक डॉ. भूपेश पाटील , आभारप्रदर्शन डॉ. विलास तायडे यांनी केले . यशस्वीतेसाठी वासुदेव वले , शबाना तडवी , डॉ. किरण चव्हाण , प्रज्ञा मून , विशाल पिकलमुंडे , सुरेश गजभिये यांनी परिश्रम घेतले .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button