Uncategorized
एका अनोळखी इसमाची रेल्वेखाली आत्महत्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव : एका अनोळखी
इसमाने रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना शेगाव ते नागझरी रेल्वे लाईनवरील खंबा नंबर ५४८/३० जवळ १७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान उघडकीस आली.
याबाबत शेगाव रेल्वेचे उपस्टेशन प्रबंधक सुरेश गोळे तर्फे आनंद कोरडे पॉइन्स मॅन यांनी शेगांव शहर पोलिसांना माहिती दिली की, एक अनोळखी इसमाने शेगाव ते नागझरी रेल्वे अप लाईनवरील खंबा नंबर ५४८/३० रेल्वे गाडी न १२८५९ समोर आत्महत्या केली. सदर इसम हा अंदाजे ३५ वर्षाचा असून त्याचा चेहरा गोल, केस काळे, शरीरबांधा सडपातळ असून याप्रकरणी पोलिसांनी कलम १९४ बीएनएस नुसार मर्ग दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि नंदकुमार आयरे हे करीत आहेत. मृतक अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे



