परिट समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे तसेच संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी

आ एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी
नागपूर – राज्यातील परिट समाजाला अनुसूचित जाती (एस सी) प्रवर्गात समाविष्ट करावे अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी अधिवेशना दरम्यान विधानपरिषद सभागृहात केली
यावेळी आ एकनाथराव खडसे म्हणाले परिट समाजाला अनुसूचित जाती (एस सी) प्रवर्गात समाविष्ट करावे अशी राज्यभरातील परिट समाजाची मागणी आहे हि मागणी शासना समोर मांडण्यासाठी राज्यभरातून समाज बांधव नागपुरात जमा झालेले आहेत
त्यांची मागणी रास्त असून परिट समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी केली पुढे बोलताना ते म्हणाले यापूर्वी आपल्या देशभरात सात राज्यात परिट समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश आहे त्याचप्रमाणे आपल्या राज्यात सुद्धा यापूर्वी काही जिल्ह्यात परिट समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश होता परंतु सन 1960 नंतर त्यांना अनुसूचित जाती प्रवर्गातून वगळण्यात आले
तरी परिट समाजाचाअनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करण्यात यावा त्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा अशी आग्रही मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली त्याचबरोबर निवडणूक कालखंडांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिट समाजासाठी संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली होती परंतु अद्याप पावेतो या घोषणेशी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही तरी तत्काळ संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून या महामंडळा मार्फत परिट समाजातील विद्यार्थांना शिष्यवृती तसेच समाज बांधवांना उद्योग उभारणी साठी अनुदान व समाज हिताच्या इतर सवलती देण्यात याव्यात अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी सभागृहात केली



