Uncategorized

पतीची क्रूरता ; पत्नीची हत्या करून तीच्या शरीराची कातडी सोलून काढली, पोलिसही अचंबित…

जळगाव प्रतिनिधी

घरोघरी मातीच्या चुली’ घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे, मात्र सध्या नवरा बायकोच्या भांडणाचे अनेक वाद समोर येतांना दिसत आहेत दरम्यान एका कुटुंबातील नवरा बायकोचा वाद किरकोळ कारणावरून इतका विकोपाला गेला की नवऱ्याने त्यांच्या पत्नीची निर्घृणपणे  हत्या करून तीच्या शरीराची साल सोलून काढली या घटनेने परिसरात खळबळ उडाली. सदर घटना कर्नाटकामधून उघकीस आली आहे.

रात्रीचं जेवण दिलं नाही आणि वाद उफाळून आला पती रात्री कामावून घरी परतल्यानंतर पत्नीने रात्रीचं जेवण दिलं नाही म्हणून पतीने तिची निर्घूण हत्या केली. या हत्येप्रकरणी कर्नाटकातील शिवारामा याला अटक करण्यात आली आहे. आरोपी पती करवतीवर काम करतो. त्याने पत्नीबरोबर झालेल्या भांडणात तिच्या डोक्यावर वार केला आणि नंतर तिची कातडी सोलून काढली. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिची त्वचा कापल्याने तिच्या नसा आणि आतड्या दिसत होत्या. तिच्या शरीराशेजारी तिचं कापलेलं डोकं ठेवलं होतं. कुनिगल तालुक्यातील हुलीयुरुदुर्गा शहरात सोमवारी रात्री ही घटना घडली.दरम्यान हत्येनंतर मृत झालेल्या महिलेची कातडी काढत होता,हत्येविषयी त्यांच्या घरमालकाला कळल्याने त्याने पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली.पत्नीची हत्या केली तेव्हा त्यांचा आठ वर्षांचा मुलगा घरातचं गाठ झोपेत होता. चौकशी दरम्यान पतीने हत्येची कबुली दिली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button