जळगावा जिल्हामहाराष्ट्र

पाण्याची बाटली घेवून येते सांगून गेली आणि बेपत्ता झाली ; जळगाव बसस्टॅण्ड येथील घटना

जळगाव, (प्रतिनिधी)- महिला तीच्या आई सोबत जळगाव बसस्थानक येथे आली होती सोबतच ३ वर्षाचा मुलगा देखील होता दरम्यान सोबत असलेल्या आईला पाण्याची बाटली घेऊन येते असं सांगून गेली पण परत आली नाही बसस्थानक आवारातून ही महिला आपल्या तीन वर्षाच्या मुलाला सोबत घेवून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २९ मे रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.

बेबाबाई योगेश बाविस्कर वय २३ आणि भाग्येश योगेश बाविस्कर वय ३ दोन्ही रा. कढोली ता. जळगाव असे बेपत्ता झालेल्या मायलेकाचे नाव आहे.जिल्हापेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कढोली गावात बेबाबाई योगेश बाविस्कर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता बेबाबाई या त्यांच्या आई रत्ना शत्रुघन कोळी आणि मुलगा भाग्येश बाविस्कर यांच्यासोबत जळगाव येथील बसस्थानक येथे आलेले होते. त्यावेळी पाण्याची बाटली घेवून येते sअसे आई रत्ना कोळी यांना सांगून बेबाबाई बाविस्कर यांनी मुलगा भाग्येस याला सोबत घेवून बेपत्ता झाल्या. त्यानंतर त्यांच्याआईने दोघांचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी २९ मे रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button