महाराष्ट्र
मतदार संघातील विद्युतीकरणाची कामे तात्काळ पूर्ण करा – आमदार राजेशजी एकडे

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
आज दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी मलकापूर मतदार संघातील महावितरणच्या प्रलंबीत कामासंदर्भात श्री.विश्वासजी पाठक संचालक, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या.यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन बुलढाणा येथे बैठक पार पडली.
यामध्ये आमदार श्री.राजेश एकडे यांनी मतदार संघातील प्रलंबीत असलेली महावितरणचे कामे तात्काळ मार्गी लावण्यात यावे अशा सुचना या बैठकीत दिल्या त्यामध्ये नांदुरा माळेगांव (गोंड) येथील प्रस्तावीत असलेले 132 के.व्ही.उप केंद्र लवकरात लवकर मार्गी लावावे, मतदार संघात काही भागामध्ये बरेच शेतकरी शेतामध्ये राहत असल्यामुळे अशा भागामध्ये कृषी फिडरवर एस.डी.टी. रोहीत्रांची व्यवस्था करुन देण्यात यावी. काही शेती पंपाचे व गावाचे रोहीत्र अतिभार असल्यामुळे अशा रोहीत्रांची क्षमता वाढून अथवा नवीन रोहीत्र वाढवून तातडीची उपाय योजना करण्यात यावी. नवीन प्रस्तावीत हिगणा काझी मलकापूर येथील 33 के.व्ही., वडगाव येथील 33 वसाडी 33 के.व्ही. हे उपकेंद्र लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे.
33/11 के.व्ही.मलकापूर, दाताळा,दसरखेड उपकेंद्रामध्ये अतिरिक्त 5 एम.व्ही.ए.चा पावर ट्रान्सफार्मवर बसविण्यात यावा. काटी व धानोरा गावात विद्युत दाब कमी असल्यामुळे शेतपंप चालत नाही तरी बेलाड उपकेंद्रमधुन लिंक लाईन टाकण्यात यावी. मलकापूर शहरातील मास्तर कॉलनी, पांढरी प्लॉट, मोहन पूरा, शिवाजी नगर, हाशमी नगर, कुलमखेड,सावजी फैल, संत ज्ञानेश्वर नगर या भागामध्ये अति दाट वस्तीत ऐरीयल बंच केबल टाकण्यात यावे. ओव्होर लोड 65 के.व्ही. असलेले रोहीत्रे 100 के.व्ही. प्रस्तावीत करण्यासाठी माकनेर रोड डी.पी.चोपडे डी.पी.शिरसोडी गावठाण डी.पी. बेलाड शाळेजवळील डी.पी.जुनी संचेती डी.पी. जाजुमील डी.पी., पी.पी.खर्चे डी.पी. महाजन डी.पी. दाताळा पाट नंबर 2 डी.पी. श्रीराम हरी डी.पी. प्रफुल चौधरी डी.पी. माकनेर गौलखेड डी.पी. वराडे डीपी निंबारी, चोपडे डीपी,भारंबे डीपी रणगाव, भानगुरा डीपी, बोरसे डीपी, चिकटे डीपी चिकटे डीपी वडोदा, मारेखेड राजेंद्र डीपी, देवधाबा गावठाण डीपी, दंड डीपी तिघ्रा, आळंद डीपी, गैबी नगर डीपी, चोपडे डीटीसी डीपी , आठवडी बाजार डीपी , पोलीस स्टेशन डीपी ,लहान गाव रोड डीपी, शाईन कॉलनी डीपी ,बाजार डीपी ,पांडुरंग पाटील डीपी , बगे डीपी,जुनी भंडारी डीपी, गावठाण कंडारी डीपी, बोंबटकर डीपी ,सातव डीपी ,इंगळे डीपी, सरोदे डीपी, भंडारी कंडारी डीपी , गोंसिंग डीपी, नारखेड डीपी ,भारंबे डीपी ,डोलखेड डीपी, निमखेड डीपी,टाकरखेड डीपी, पिंपळखुटा लांडे डीपी, शेंबा डीपी, हेलगे नगर डीपी, पिंपळमखुटा धांडे डीपी, तरवाडी डीपी, चौरे महाळुंगी डीपी. झांबरे डीपी , बरफगांव डीपी ,
अतिरिक्त दाबाचे 100 के.व्ही. असलेले रोहीत्रे 200 के.व्ही. प्रस्तावीत करण्यात यावीत यामध्ये आदर्श नगर डीपी, पानाधारी प्लॉट, गदगाह मदार टेकडी, पूजा किराणा डीपी,फिरदोस डीपी,गणेश नगर, गजानन नागरी डीपी, हुतात्मा स्मारक डीपी, जनता कॉलेज डीपी, कृपाल शेठ डीपी. लखानी प्लॉट डीपी. ताज नगर डीपी. टावरी डीपी., शहर पोलीस स्टेशन डीपी. आनंद सोसायटी डीपी.
कायम व्यवस्थीत विद्युत दाब राहण्यासाठी अतिरिक्त रोहीत्रे प्रस्तावीत करण्यात यावेत अशी मागणी दाताळा मोरखेड रोड डीपी.माकनेर मनु पाटील डीपी. उमाळी वावगे डीपी. शिराढोण जुनी एजी डीपी. देवधाबा गावठाण डीपी. भालेगांव गावठाण डीपी.धरणगांव गावठाण डीपी. नरवेल गावठाण डीपी. वाघुळ गावठाण डीपी. धानोरा. या गावाकरीता करण्यात आली.
वरील सर्वबाबींवर चर्चा करण्यात आली असता श्री.विश्वासजी पाठक यांनी सर्व कामे लवकरच पुर्ण करुन असे आश्वासन आमदार महोदयांना यावेळी दिले या विद्युतीकरणांच्या कामामुळे शेतकऱ्यांना दिवसरात्र सिंचनाची सोय उपलब्ध होणार असुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चीत भर पडणार आहे.



