बुलढाणाशैक्षणिक

निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सोहळा संपन्न.

स्वाभिमानीने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद!कृषीधिकारी अमोल बनसोड.

संग्रामपूर/तालुक्यातील पातुर्डा येथिल जिल्हा परिषद हायस्कूल मधे जागतिक महिला दिनानिमित्त पार पडलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा सन्मान चिन्ह व प्रशिस्त पत्र देऊन बक्षिस वितरण समारंभ संपन्न करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धेतील विजेते गट ‘अ’ ६ ते ७ मध्ये प्रथम क्रमांक प्रांजल दिनकर गिऱ्हे,द्वितीय क्रमांक दर्शना विनोद गवई, तृतीय क्रमांक सुरेखा सुनिल दाभाडे, आणि गट ‘ब’ ८ ते ९ मध्ये प्रथम क्रमांक पुनम विनोद दाभाडे, द्वितीय क्रमांक सृष्टी संजय रहाटे, तृतीय क्रमांक अंकिता प्रमोद देऊळकर या विद्यार्थ्यींना स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, मुख्याध्यापक रामचंद्र नरवाडे सर, महाराष्ट्र बँक शाखा व्यवस्थापक विक्रम इंगळे, स्वाभिमानीचे नेते उज्वल पाटील चोपडे , विठ्ठल वखारे , इत्यादी मानवारांच्या हस्ते विद्यार्थ्यांनीना स्मृती चिन्ह आणि प्रशस्ती पत्र सन्मानित करण्यात आले, यावेळी महादेव कुरवाडे सर,तालुका अध्यक्ष उज्वल खराटे, सुनील तायडे, बाबुराव येरुळकर, दाऊद शहा, अंकित सुलताने, प्रदीप पांडे उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button