खामगांव विधानसभा मतदार संघाची वाटचाल विकसीत मतदार संघाकडे- आ.ॲड.आकाश फुंडकर

खामगांव विधानसभा मतदार संघाची वाटचाल विकसीत मतदार संघाकडे- आ.ॲड.आकाश फुंडकर
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे आज मतदार संघातील गणेशपूर सर्कल मधील 24 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन थाटात संपन्ऩ.खामगांव तालुक्यातील 107 गावातील 172 कामांचे रु.183 कोटी रुपयांच्या कामांचे होणार भुमिपूजन व लोकार्पणाचा “विकास पंधरवाडा”.खामगांव देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य़ साधून आज दि.17 सप्टेंबर 2023 पासून खामगांव मतदार संघातील गणेशपूर सर्कल मधील 24 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या शुभहस्ते थाटात संपन्ऩ झाले यावेळी बोलतांना आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले की, खामगांव विधानसभा मतदार संघ हा एक विकसीत मतदार संघ म्हणून ओळख निर्माण करीत आहे. आज दि.17 सप्टेंबर 2023 रोजी खामगांव विधानसभा मतदार संघातील गणेशपूर सर्कल मधील 24 कोटी रुपयांच्या कामाचे भूमीपूजन खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र भाजपा सोशल मिडीया सहसंयोजक श्री सागरदादा फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्ऩ झाले. खामगांव विधानसभा मतदार संघातील विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा,समर्पण अभियान अंतर्गत “विकास काम पंधरवाडा” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात मतदार संघातील खामगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळपास 107 गावातील 172 कामांचे कामांचे 183 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या विकास कामांमध्ये मतदार संघातील पाणीपुरवठा योजना, मोठे रस्ते, गावातील रस्ते, सभागृह, सभामंडप, स्मशानभूमी, नाल्या , यांचा समावेश असून आज दि.17 सप्टेबर रोजी मतदार संघातील गणेशपूर सर्कल मधील वर्णा, सारोळा, गेरु, श्रीधर नगर, माटरगांव गेरु, गणेशपूर, झोडगा, वझर या गावातील 24 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. यामध्ये नवबौध्द़, बौध्द़ समाजांच्या स्मशानभूमी, रस्ते , नाल्यांचा, सभागृह, सभामंडपांचा देखील समावेश आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या घोषणेप्रमाणे सबका साथ सबका विकास खामगांव विधानसभा मतदार संघात आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या माध्यमातून सुरु आहे. आज खामगांव शहरासह ग्रामीण भागातील मागील अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेली कामे पुर्ण झालेली असून मतदार संघाचा मागील 8 वर्षाच्या कार्यकाळात आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी “समग्र व शाश्वत़ विकास” केला असून मतदार संघातील नागरीकांचे जीवन त्यामुळे सुकर झालेले आहे. या कार्यक्रमावेळी श्री शरदचंद्र गायकी, डॉ एकनाथ पाटील, हरसिग साबळे, भगवानसिंग सोळंके,शांताराम बोधे, डॉ गोपाल गव्हाळे, समाधान मुंढे, संजय ठोंबरे, रतनसिंग परमार, यांचेसह उपरोक्त़ गावातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.



