होय मी सावरकर ! आम्ही सारे सावरकर !

यापुढे स्वातंत्रवीरांचा अपमान सहन केल्या जाणार नाही- आमदार ॲड आकाश फुंडकर
खामगांव शहरात निघाली भव्य़ स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा
खामगांव- त्याग आणि समर्पणाची प्रतिमूर्ती, प्रखर राष्ट्रभक्त आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्रोत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य गौरव यात्रेचे आयोजन आज दि.06 एप्रिल 2023 गुरुवारी स.10.00 वा भाजपा शिवसेना युती व्दारे करण्यात आले. याआधी भाजपा कार्यालयावर भाजपाच्या जेष्ठ़ कार्यकर्त्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले व ध्वजवंदना करुन भाजपा कार्यालय टॉवर चौक खामगांव येथून या गौरव यात्रेस सुरुवात झाली भाजपा शिवसेना प्रेमी व सर्व स्वातंत्रवीर सावरकर प्रेमीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रेचे नेतृत्व़ भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केले. सदरची यात्रा टॉवर चौक, एकबोटे चौक, भगतसिंग चौक, फरशी, मोहन टॉकीज चौक, मेनरोड जगदंबा चौक, सरकी लाईन येथून छत्रपति शिवाजी महाराज स्टेडीयम येथे पोहचली या ठिकाणी छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय, भारत माता की जय, वंन्दे मातरम, अमर रहे अमर रहे स्वातंत्रवीर अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
कर्तृत्वशुन्य़ व्यक्तीमत्व़ काँग्रेस उपाध्यक्ष व कॉग्रेसचे सर्वेसर्वा राहूल गांधी हे स्वतंत्रवीर सावरकरांच्या नखाचीही बरोबरी नसलेले असे व्यक्ती असून देखील मागील अनेक वर्षापासून त्यागमुती आपल्या सर्वांचे प्रेरणा स्थान स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बाबत सतत अपमानजनक वक्तव्य़ करीत आहेत. स्वातंत्रवीरांनी 11 वर्ष काळयापाण्याची शिक्षा भोगली आहे. त्यांना विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेस सतत माफीवीर म्ह़णत आहे. हा एका स्वातंत्रवीराचा अपमान असून तो कोणीही भारतीय सहन करणार नाही. स्वातंत्रवीर सावरकरांनी काळयापाण्याची शिक्षा भोगतांना किती यातना सहन केल्या हे आपण कल्पना देखील करुन शकत नाही. उपाशी ठेऊन त्यांना तेलाच्या घाण्याला जुंपले जात होते. त्यांना कोडे मारल्या जात होते. गळयात हातात, पायात जड लोखंडी बेडया घातल्या जात होत्या. त्यांचा अपराध एवढाच होता की त्यांनी स्वातंत्र्याची मशाल देशातल्या तरुणांमध्ये पेटविली होती. इंगजांनी भिती होती की ते पुन्हा महाराष्ट्रात आले तर इंग्रजांना सळो की पळो करतील. त्यामुळे त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. परंतु अशाही परिस्थितीत त्यांच्या मनाची व्यथा, मातृभूमी विषयीची तळमळ, “ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला” या ओवीतून मांडली. त्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांवरची पहिली कवीता “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा” जी आज छत्रपतिंची आरती म्हणून शिवजयंतीला पुजल्या जाते. मातृभूमीबददलचे त्यांचे प्रेम त्यांच्या “जयोस्तुते” व “तानाजीचा पोवाडा” ह्या कवितेतून साऱ्या जगाला कळले आहे. परंतु या स्वातंत्रीवीरांचा अपमान होत असतांना सत्ता मिळविण्याच्या हव्यासापोटी राज्यातील उध्दव़ ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँगेस पार्टी कोणताही विरोध दर्शवतांना दिसत नाही. उलट त्यांचे समर्थनच करतांना दिसत आहेत यापुढे स्वातंत्र्यविरांचा अपमान सहन केल्या जाणार नाही असे ही आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले. राज्यातील मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशाने आज खामगांव शहरात ही भव्य़ स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. छत्रपति शिवाजी महाराज स्टेडीयम येथे समारोप प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले.
यावेळी संजय शिनगारे,भाजपा जिल्हा सचिव,संजय अवताडे उपजिल्हाप्रमुख शिवसेना,राकेश राणा जिल्हा सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा, सुरेश गव्हाड,तालुकाध्यक्ष भाजपा,सुरेश वावगे,तालुका प्रमुख शिवसेना,चंदशेखर पुरोहित शहराध्यक्ष भाजपा खामगांव,ॲड रमेश (बाबु) भटटड,शहर प्रमुख शिवसेना खामगांव शहर, राम मिश्रा, भाजयुमो शहराध्यक्ष, राहुल कळमकार शहर प्रमुख युवा सेना, पवन गरड जिल्हाध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी, जेष्ठ़ मार्गदर्शक रामदादा मोहिते, रमेशकाका खिरडकर, बापू करंदीकर, ओमभाऊ खंडेलवाल, रुपेश खेकडे भाजयुमो तालुकाध्यक्ष,राजू बघे तालुका प्रमुख युवा सेना,शुभम देशमुख भाजपा विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष,राज टिकार (पाटील), भाजपा विद्यार्थी आघाडी खामगांव तालुकाध्यक्ष,राजेश झापर्डे, अमोल अंधारे, संजय ऊर्फ मुन्नाभाऊ पुरवार, वेभव डवरे, राजेंद्र धनोकार, आनंद (पप्पु) शहाणे, सत्यनारायण थानवी, विलास देशमुख, शिवानी कुळकर्णी, भाग्यश्री मानकर यांच्यासह भाजपा, शिवसेना, पदाधिकारी कार्यकर्ते, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी जनता तसेच देशभक्त़ नागरीक या यात्रेत सहभागी झाले हेाते.




