आंबेडकर नगर येथील यशोदाबाई पवार बेपत्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर येथील आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी यशोदाबाई रामु पवार या दि. ५ मे २०२६ रोजी मंगळवार दुपारी सुमारे १२:३० वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता अद्याप त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित महिला कोणाला कुठे दिसल्यास किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांचे पती रामु लक्ष्मण पवार यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : ७९७२८२१६७२
महिलेचा पत्ता :
रा. आंबेडकर नगर, मुक्ताईनगर
ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव.



