Uncategorized

नदी मध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

नदी मध्ये बुडून तरुणाचा मृत्यू………..

स्टार भारतलाइव एक्सप्रेस

ठाणे जिल्हा प्रतिनिधी

प्रफुल्ल पहुरकर

येथील खुटाडी गावाजवळ भातसा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी उघडकीस आला. यश पवार (२१) असे मृताचे नाव असून तो मिरारोड भागात राहतो. यश हा मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. मिरारोड येथील काशिमीरामध्ये राहणारा यश हा त्याच्या १५ ते २० मित्र-मैत्रिणीसोबत दुचाकीने फिरण्यासाठी आला होता. खुटाडी गावाजवळ भातसा नदीच्या किनारी पॉवर हाऊस जवळील डोहामध्ये यश पोहण्यासाठी उतरला होता. यश बुडत असल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी पोलिसांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशला नदीतून बाहेर काढण्यात आले. त्याला उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 🖋️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button