लग्न करिता अल्पवयीन मुलीस फुस लावून पळून नेणारा नराधमास राहुरी पोलिसांकडून अटक

जिल्हा प्रतिनिधी देवेंद्र शिंदे
सविस्तर वृत्तांत असा
आदरणीय सर राहुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 07/2025 BNS कलम 137(2), 87 सह पोक्सो अधिनियम कलम 8, 12 सह गुन्हा दाखल असून यातील आरोपीने अल्पवयीन मुलीस लग्नाच आमिष दाखवून तिचे अपनयन केले होते म्हणून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी नामे विकी उर्फ विकास प्रकाश शिरसाठ व 24 वर्ष राहणार मोकळ मोहोळ तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यास राहुरी पोलिसांनी दिनांक 05.02. 2025 रोजी अटक केली आहे त्यास माननीय न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडी रिमांड घेण्याची तजवीज चालू आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करत आहेत.
सर्व नागरिकांना याद्वारे आव्हान करण्यात येते की कोणीही आपल्या मुला अथवा मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये. अन्यथा त्यांच्यावर व लग्न जुळणारे आई-वडील सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल होतो. सर्व ग्रामपंचायत, पोलीस पाटील, ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आपापल्या क्षेत्रामध्ये जनजागृती करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
*सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे, साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे ,पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे , सतिष कुऱ्हाडे ,गोवर्धन कदम, अंकुश भोसले, इफ्तेखर सय्यद, सचिन ताजने यांच्या पथकाने केलेली आहे.
सविनय सादर,



