खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसांस्कृतिक

धम्मक्रांती फाउंडेशन तर्फे नायगाव येथे पुरस्कार वितरीत*

*धम्मक्रांती फाउंडेशन तर्फे नायगाव येथे पुरस्कार वितरीत* (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे) :-. सविस्तर वृत्त असे की नायगाव येथे दि. १५ ते २३ अक्टोबर या कालावधीत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा नायगाव ता. मुक्ताईनगर च्या विद्यमानाने बहुजन महानायिका वैचारिक जागर नवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात ९ दिवस माता रमाई, राजमाता जिजाऊ, वीरांगना झालकारी, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले. फातिमा शेख, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, आणि राणी दुर्गावती यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रबोधन, गीत गायन, तसेच बालकांसाठी खेळामंध्ये निंबू चम्मच, संगीत खुर्ची, जो जीता वो सिकंदर असे अनेक प्रकारचे खेळ आयोजित करण्यात आले होते त्यामंध्ये ज्यांनी उत्कृष्ट असे प्रबोधन, गीत गायन केले व खेळामंध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक मिळविला अशा नायगाव येथील बाल महायिका निवेदिता मनोहर तायडे, आम्रपाली संघरत्न पोहेकर, खुशबू प्रमोद भालेराव, प्रेरणा रमेश पोहेकर, स्वाती विनोद अढागळे, कल्याणी भागवत तायडे, स्नेहल मुकेश तायडे, गार्गी किरण पोहेकर, आरुषी जीवन पोहेकर या विजेत्याना धम्मक्रांती फाउंडेशन तर्फे बाल साहित्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले, तसेच नायगाव येथील देवानंद जगन्नाथ कोळी यांची इंडिअन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांच्या वडिल जगन्नाथ रामकृष्ण कोळी यांना आदर्श पिता पुरस्कार सन्मानित करण्यात आले, व गावातील महिलांना आदर्श महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच बुद्धिस्ट सेवाभावी संस्थे तर्फे बाल प्रबोधन पुरस्काराने ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले व गावातील सरपंच यांच्या कडून बंद पाकीट रोख बक्षिश देण्यात आले तसेच गावातील महिला व विद्यार्थ्यांना सुद्धा पुरस्कार गावातील सरपंच मोनाली महाजन ,ग्राम पंचायत सदस्या सुपडाबाई भालेराव, उपसरपंच महेशभाऊ महाजन, भागवतभाऊ कोळी, किशोरभाऊ आर महाजन,चंपालालभाऊ महाजन, ग्राम पंचायत सदस्य गोपालभाऊ न्हावी, बाळूभाऊ कवळे, सदाशिवभाऊ सोंदळे, पांडुरंगभाऊ पाटील, किशोरभाऊ महाजन, भास्करभाऊ महाजन, प्रशांतभाऊ महाजन, गोपालभाऊ पाटील, प्रल्हादभाऊ महाजन, विनोदभाऊ महाजन, अतुलभाऊ पाटील यांच्या हस्ते पुरस्कार, ट्रॉफी व रोख बक्षिसे वितरित करण्यात आले सदर कार्यक्रमाची प्रास्ताविका आशा पोहेकर, व भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आर के मोरे यांनी केली कार्यक्रमात अनमोल असे मार्गदर्शन माजी पी.आय आर एन पोहेकर साहेब, माजी सहा फौजदार एस बी पोहेकर, महेशभाऊ महाजन, प्रशांतभाऊ महाजन यांनी केले असून सुत्रसंचालन बौद्धाचार्य दिलीप पोहेकर व धम्मक्रांती फाउंडेशनचे सचिव प्रमोद भालेराव यांनी केले तसेच आभार बौद्धाचार्य संजय म्हसाने यांनी केले सदर कार्यक्रमाची प्रसंगी धम्मक्रांती फाउंडेशनचे सर्व सभासद, श्रामनेर मनोज पोहेकर, मयूर अढागळे, भीमराव पोहेकर, मनोज तायडे,सिद्धार्थ तायडे, रतन पोहेकर, सुभाष अढागळे, विनोद अढागळे , भूषण अढागळे, भूषण इंगळे आदी बौद्ध उपासक उपासिका व नागरिक उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button