खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

जळगाव चे पहिले आमदार तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू दौलत गुलाजी अर्थात डी. जी. जाधव यांचा आज स्मृतिदिन.

        चाळीसगाव पासून अवघ्या १२ की. मी. अंतरावर तीतुर नदीवर वसलेले  वाघळी या ऐतिहासिक गावी १२ डिसेंबर १९०९ मध्ये जन्मलेले दौलत गुलाजी जाधव यांचा जन्म झाला . गरिबिवर मात करून ते बी. ए. , एल.एल.बी. झाले . वयाच्या १७ व्या वर्षी त्यांची आसोदा तालुका , जिल्हा जळगाव येथे श्री संत चोखामेळा वसतिगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत भेट झाली . पुढं मॅट्रीक नंतर बाबासाहेबांनी त्यांना शिक्षणाकरिता खूप सहकार्य केले .  पुढं वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी स्वतंत्र मजूर पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना जळगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली .  सेनु नारायण मेढे  यांना बाबासाहेबांनी तिकीट न दिल्याने मेढे यांनी बंडखोरी केली , असे असले तरी जाधव हे निवडून आले . बंडखोरी होणे , त्यातून पक्षाचा माणूस निवडून येणे ही बाब त्याकाळी जळगाव जिल्ह्यात बाबासाहेबांची चळवळ किती भक्कम व सक्रिय होती हे दिसून येते.
         रेल्वे भरती बोर्डाचे सदस्य असताना जाधव हे कलकत्ता येथे राहत होते . त्यांच्या घरी काही शासकीय नोकर - चाकर होते . १९४३ च्या दरम्यान एके दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या घरी मुक्कामी गेले . तेंव्हा एका अस्पृश्य माणसाच्या भेटीमुळे जाधवांचा बंगला बाटला म्हणून आम्ही या पुढं इथं काम करणार नाही असे सांगून सर्व नोकरांनी जाधव यांच्याकडं काम करणे बंद केले .( या भेटी पर्यंत त्या नोकरांना जाधव एक अस्पृश्य आहेत हे माहीत नव्हते ) हा प्रसंग बाबासाहेबांनी तेंव्हाच्या गव्हर्नर कड मांडला , पण त्याचा काही परिणाम झाला नाही. ते नोकर पुन्हा जाधवांकड कधी आलेच नाही.
      अनेक मोठ मोठ्या हुद्यावर राहिलेल्या जाधवांचे दिनांक  १३ मे १९७९ ला निधन झाले .त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
    जयसिंग वाघ, जळगाव 
     

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button