क्राईमखानदेशगुन्हेगारीजळगावा जिल्हापुणे

पुण्यात कोयता गँगची दहशत वाढली : टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

जळगाव | १५ मे २०२५ राज्यातील पुणे शहरातील दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी चिंतेचा विषय बनली आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. भर रस्त्यात होणारे हल्ले आणि खुनाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील दत्तवाडी परिसरातील एका घडली आहे. सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाले असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील दत्तवाडी परिसरातील एका रस्त्यावर भररस्त्यात सात ते आठ जणांचे टोळके एका तरुणाच्या मागे कोयता आणि इतर धारदार हत्यारे घेऊन धावत होते. टोळक्यापासून वाचण्यासाठी तरुणाने जीवाच्या आकांताने धावत होता. मात्र, रस्त्यावर त्याचा तोला गेला आणि खाली कोसळला. इतक्यात त्याच्या पाठीमागून हातात कोयता घेऊन आलेल्या एकाने त्याच्यावर वार केला. त्यानंतर इतरांनीही त्या तरुणावर कोयत्याने हल्ला केला. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.या हल्ल्यात तरुण गंभीरित्या जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार करण्यात आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये घटनेचे नोंद करण्यात आले असून पोलिसांनाकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button