अखेर मालेगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला,भाजप नेते ॲड.नकुल देशमुख,सुरेश मुंडे यांच्या प्रयत्नाला यशवाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाडमालेगांव

अखेर मालेगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला,भाजप नेते ॲड.नकुल देशमुख,सुरेश मुंडे यांच्या प्रयत्नाला यशवाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड मालेगांव : – अखेर मालेगांव शहराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला गेले कित्येक वर्ष मालेगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी पाणीप्रश्नासाठी आंदोलन केले व उपोषण सुद्धा केले परंतु तेव्हापासून प्रत्येक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी होऊन सुद्धा लोकप्रतिनिधींना जाग आला नव्हता परंतु काही नेते मंडळींनी जातीने लक्ष देऊन ही समस्या मिटली मालेगांव शहराचा अतिरिक्त पाणी प्रश्न मार्गी लागला असून भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख ॲड नकुल देशमुख व भाजप तालुकाध्यक्ष सुरेश मुंडे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे मालेगाव शहराचा पाण्याचा प्रश्न एक महत्वाचा विषय बनला होता मोठ्या प्रमाणात मालेगाव शहरातील नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत होते दि.१३ एप्रिल रोजी रिसोड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य संकल्प सभा पार पडली होती या सभेत राज्याची माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मालेगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती त्याच सभेत उपमुख्यमंत्र्यांनी सदर मागणी मान्य करत लवकरात लवकर हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात आश्वस्त केले होते यासंदर्भात हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी भारतीय जनता पक्षाचे रिसोड-मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड.नकुल देशमुख व भाजपा मालेगाव मालेगाव तालुकाध्यक्ष सुरेश मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न केला याचा योग्य तो पाठपुरावा केला व त्यांच्या प्रयत्नांना यश आले व मालेगावकर नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून लोकांकडून समाधान व आनंद व्यक्त होत आहे या संदर्भात शासन निर्णय झाला असून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने हा शासन निर्णय जाहीर केला आहे मालेगाव पाणीपुरवठा योजना, चाकातीर्थ बृहत लघु पाटबंधारे योजना अंतर्गत १.४२६ वाढीव दलघमी वाढीव म्हणजेच एकूण २.३२६ दलघमी पाण्याचा हक्क मंजूर केला असून यामुळे मालेगाव शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गे लागणार आसून शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे रिसोड येथील सभेत माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी केलेल्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्याने हे काम मार्गी लावले असून या कामासाठी ॲड.नकुल देशमुख सुरेश मुंडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्यास व प्रयत्नांना यश आले असून हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे.बॉक्सनगरपरिषद व नगरपालिका वाशिम व हिंगोली या ठिकाणी शुद्ध पाण्याचा टॅक्स 900 रुपये असतो परंतु मालेगाव शहरातच हा पाण्याचा टॅक्स बाराशे रुपये असुन तेही नळाला पाणी गढूळ व एका महिन्यातून दोन ते तीन वेळा नळ येतात आणि बाराशे रुपये टॅक्स मोजावे लागतो अशीच ही सुद्धा समस्या गांभीर्याने लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून मनावर घेऊन हा टॅक्स सुद्धा कमी करावा असे मत सामाजिक कार्यकर्ता सागर अहिर यांनी केले आहे.



