बुलढाणाराजकीय

आ. डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात प्रभाग ६ मधील युवकांचा भाजपात प्रवेश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर
विदर्भ ब्युरो चिप

शेगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपाच्या झेंड्याखाली युवकांची मोठ्या संख्येने घरवापसी झाली आहे. लोकप्रिय आमदार डॉ. संजय कुटे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून संतोष खंडारे यांच्यासह असंख्य युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी आमदार डॉ. संजय कुटे यांनी सर्व युवकांचे भाजपात स्वागत करताना त्यांना पक्षाचा दुपट्टा परिधान करून सत्कार केला. तसेच या प्रवेशाम ळे पक्षसंघटनेला नवचैतन्य मिळाल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला भाजपा नेते व माजी

नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल, पुरूषोत्तम शेगोकार, पांडुरंग बुच, रविकांतदादा पाटील, संजय कलोरे, राजु अग्रवाल, नितिन शेगोकार, भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, भाजपा युवा म ोर्चा अध्यक्ष सचिन ढमाळ, नितिन कराळे व भाजपा पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती. प्रवेशानंतर झालेल्या सभेत उपस्थित सर्व युवकांनी होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ६ मधून भाजपाच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. विकासासाठी भाजपा, विश्वासासाठी आ डॉ. संजय कुटे” असा युवकांनी एकमुखी निर्धार यावेळी केला. अलीकडच्या घडामोडींमुळे प्रभाग ६ मधील राजकीय समीकरणे पन्हा

भाजपाच्या बाजूने झुकताना दिसत असून, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पक्षावरील वाढता विश्वास आगामी निवडणुकीत भाजपासाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. यावेळी प्रभाग ६ मधील रायली फैल परिसरातील संतोष खंडारे यांचेसह सहदेव शेगोकार, महादेव शेगोकार, सोनू शेगोकार, इंद्र चंदनशिव, अवि शेगोकार, वैभव गायकवाड, अभिजित शेगोकार, दिपक शेगोकार, भागवत राजुस्कर, संकेत ताले, आशिष चातुरकर, गजानन शेगोकार, प्रकाश शेगोकार, प्रकाश चंदनशिव, जय गायकवाड, वैभव आयले, पांडुरंग राजुस्कर, मार्तंड राजुस्कर, विलास ताडे, अर्जुन दरपे, पवन मागटे, महेश गुजर आदींनी भाजपात प्रवेश घेतला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button