Uncategorized
दहीगाव ईथे इसमाने गळफास लावून जीवनयात्रा संपवली.

*दहीगाव ईथे इसमाने गळफास लावून जीवनयात्रा संपवली.
*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,तेल्हारा ग्रा.प्रतिनिधी अरुणजी कोरडे दि. 1/03/2023तेल्हारा : तेल्हारा पोलिस स्टेशन अंतर्गत दहीगाव येथे राजेश रामलाल खोंदिल यांनी दि. 28/02/2023 मंगळवार रोजी मध्य रात्री उशीरा गळफास लावून स्वत ची जीवनयात्रा संपवली. मृतक हे व्यवसायांनी शेतकरी होते,दि 1/3/2023 बुधवार रोजी पहाटे साडे सहा ला हि घटना निदर्शनास आली.सकाळी 9 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन तेल्हारा येथे एफ.आय.आर. दाखल करण्यात आला.वृत्त लिहीपर्यंत मृत्यू चे कारण कळाले नाही. कायदेशीर कारवाई पो.स्टे.तेल्हारा चे ठाणेदार साहेब, बिट जमदार पुंडकर साहेब करीत आहेत.श्री राहुल पोपटराव तायडे स्टेशन डायरी राईटर यांच्या कडुन सदर माहिती संकलित करण्यात आली.



