थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

भुसावळ प्रतिनिधी
येथील खान्देश लाईव्हच्या कार्यालयात थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स येथे पार पडला.यावेळी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत समाजप्रबोधन, स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षण प्रसारासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमा प्रसंगी परिट संघटनेचे माजी अध्यक्ष रमेश ठाकरे , बाळू शेलोडे , राहुल रोकडे ,पत्रकार संतोष शेलोडे, कमलेश चौधरी, मनोहर लोणे, सुनिल आराक , शाम गोविंदा , सतिष कांबळे , दिपक परदेशी , संजय काशिव , सतिष शिंदे , प्रशांत बोरोले , पवन सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रमेश ठाकरे , मनोहर लोणे व सुनिल आराक यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त करत त्यांच्या विचारांचे आचरणात पालन करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे वातावरण श्रद्धा, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीने भारलेले होते.



