बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिकसांस्कृतिक
जि .प .कें.म. प्राथमिक शाळा पिंपळगाव काळे येथे संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी!*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण
जळगाव जामोद :” स्वच्छता हीच सेवा”* हा मंत्र देणारे थोर समाजसुधारक, कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची जयंती आज दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा, पिंपळगाव काळे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली..
संत गाडगे महाराज यांचे प्रतिमेचे पूजन पूजन करून त्यांच्या कार्याविषयी शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
“स्वच्छता हीच सेवा” हा मंत्र केवळ शाळेपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या जीवनाचा भाग कसा बनवता येईल, यावर अनमोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाळेतील सर्व आदरणीय शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.



