बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक

तेल्हारा शहरामध्ये डोळ्यांचे पारणे फेडणारा भव्य-दिव्य कावड यात्रा महोत्सव

तेल्हारा शहरामध्ये डोळ्यांचे पारणे फेडणारा भव्य-दिव्य कावड यात्रा महोत्सव

(शिवसेनेच्या वतीने करण्यात आले तब्बल १००० लीटरचे शीतपेय शरबतचे वाटप)

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी-व्ही एम घोडे

दि 11 सप्टेंबर सोमवार रोजी या वर्षीचा शेवटचा श्रावण सोमवार असल्याकारणाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तेल्हारातील सर्व कावडधारी मंडळांनी भव्य-दिव्य कावड यात्रा महोत्सवाचे आयोजन केले होते.
यावेळी शहरातील मानाचे कावडधारी मंडळ म्हणून ओळखल्या जाणारे शहरातील गौतमेश्वर शिवभक्त कावडधारी मंडळाचे सर्वप्रथम शिवसेना तेल्हारा तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव शहर प्रमुख अनिकेत ढवळे व सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी व शिवसैनिक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची सामुदायिक महाआरती करण्यात आली व पुढे शहरातील सर्व कावड शिवभक्त मंडळाचे लागोपाठ एका मागे एक अशा स्वरूपात पूजन व स्वागत करण्यात आले तसेच शिवसेना तेल्हारा शहर व तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ अग्रसेन टॉवर चौका येथे सर्व कावडधारी मंडळाना तब्बल १००० लीटर शीतपेय शरबतचे वाटप करण्यात आले. नंतर ह्या सर्व कावडधारी मंडळानी शहरातील मुख्य व ठरवलेल्या मार्गाने प्रस्थाण केले.
यामध्ये प्रामुख्याने जय
भवानी चौकातील गौतमेश्वर शिवभक्त कावडधारी मंडळ ,एकता मित्र मंडळ ,न्यु भवानी कावड मंडळ, एक नंबर वासी कावळ मंडळ, जुने शहर वासी कावड मंडळ हे सर्व कावडधारी मंडळ या कावड यात्रेमध्ये सहभागी झाले होते या सर्व कावळधारी मंडळांचे विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल व लोकजागर मंच या संघटनांनी सुद्धा पूजन व हार्दिक स्वागत केले हा .कावडधारी शिवभक्त मंडळांचा भव्य दिव्य यात्रा महोत्सव पाहण्याकरिता असंख्य भाविकांची गर्दी टावर चौकामध्ये तथा शहरातील मुख्य मार्गावर जमली होती. यात्रा महोत्सव दरम्यान कावळधारी मंडळांनी विविध देखावे सादर केले असून हे देखावे डोळ्याचे पारणे फेडणारे होते,तर विशेष आकर्षण ठरलेला तेल्हारा शहरातील नवीन स्थापन झालेला स्वयंसिध्दा या ढोल पथक, या ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते ,तेल्हारा पोलीस कर्मचाऱ्यांच्या चोख बंदोबस्तात यावर्षीची शेवटची कावड यात्रा मोठ्या थाटात संपन्न झाली , हा कावळ यात्रा महोत्सव पाहण्याकरिता तेल्हारा शहर व तालुक्यातील शिवसेना युवासेना महिला आघाडी व आजी माजी पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक तथा शहरातील नागरीक उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button