तेल्हारा ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रात मातेश्वरी जगदंबा सरस्वती स्मृती दिवस साजरा.

*तेल्हारा ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रात मातेश्वरी जगदंबा सरस्वती स्मृती दिवस साजरा.
*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा
तालुका प्रतिनिधी विजय घोडे
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तेल्हारा येथे २४ जुन शनिवारी सकाळी ब्रह्माकुमारीज संस्थेच्या प्रथम मुख्य प्रशासिका मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांचा स्मृती दिवस साजरा करण्यात आला.सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी सह सर्व उपस्थित ज्ञानार्थी भाऊ बहिणींनी सर्वप्रथम मम्मा च्या प्रतिमेला पुष्पमाला व पुष्प अर्पित करून श्रद्धांजली अर्पित केली.मातेश्वरी जगदंबा सरस्वती उर्फ मम्मा यांना श्रद्धांजली अर्पित करताना प्रमिला दीदींनी त्यांच्या ब्रह्माकुमारीज परिवाराच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याला व त्यांच्यातील सद्गुन,त्याग तपस्या इत्यादी अविस्मरणीय व प्रेरणादायी क्षणाना उजाळा दिला.मम्मा नी सदैव शिव बाबांनी दिलेल्या श्रीमतप्रमाने वागून स्वतःचे जीवन आदर्श मूर्त बनविले.मम्मा सर्वगुणसंपन्न होत्या त्यांनी प्रत्येक क्षणाला अंतिम क्षण समजून पुरुषार्थ करून संपूर्णतेची स्थिती प्राप्त केली.मम्मा हर्षितमुखता,मधुरता,पवित्रता,अंतर्मुखता,सहनशीलता इत्यादी गुणांची भांडार होती.मम्मा आपल्या मनात सर्वांसाठी सदभावना,शुभभावना ठेवीत होती.प्रत्येक मनुष्याला आत्मा समजून त्यांनी सर्वांना आत्मिक प्रेम दिले.मम्मा नी राजयोग साधनेच्या माध्यमातून रुद्रयज्ञरक्षक,अज्ञाकारी,निरहंकारी,बनून मानवतेची समर्पितपणे सेवा केली.मम्मा प्रमाणे श्रीमत वर चालत राहून ईश्वरीय सेवा समर्पितपणे करणे हिच खरी श्रद्धांजली मम्मा ला ठरेल असे मनोगत प्रसंगी प्रमिला दीदींनी व्यक्त केले.स्मृती दिवसाच्या आयोजनासाठी ब्रह्माकुमार श्याम भाई,ब्रह्माकुमारी स्नेहल दीदी यांच्या सह स्थानिक ज्ञानार्थी भाऊ बहिणींनी महत्वपूर्ण सहकार्य केले.



