गुन्हेगारीजळगावा जिल्हामहाराष्ट्र

सावदा सहकारी दूध उत्पादक संस्थेत पोलिसांची छापेमार; दारू विक्रीचा पर्दाफाश, दारूच्या बाटल्या केल्या जप्त…!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

सावदा शहरातील सहकारी दूध उत्पादक संस्थेमध्ये बेकायदेशीरपणे विदेशी दारूची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी छापेमार कारवाई करत हा प्रकार उघड केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या मागील खोलीत विदेशी दारूचा साठा करून विक्री केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष तातडीने छापा टाकला.छाप्यामध्ये डेअरीच्या किचन रूममध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये 750 एमएलच्या 9 सिलबंद विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांची किंमत सुमारे 13 हजार 500 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी हा साठा जप्त करत पुढील कारवाई सुरू केली.या प्रकरणात संस्थेतील क्लर्क नितीन रामकृष्ण बेंडाळे (वय 46, रा. सावदा) याने विक्रीसाठी दारू आणल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या अवैध दारू विक्रीमध्ये संस्थेच्या संचालक मंडळाचा काही संबंध आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सहकारी संस्थांमधील गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पो.हे.कॉ उमेश पाटील, पो.ना. जाकीर मन्सुरी आणि पो.कॉ मयूर पाटील यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button