दोन थेंब जीवनाचे, उज्ज्वल भविष्याचे….

जी.डी. रोकडे बुलढाणा प्रतिनिधी
आज राष्ट्रीय पोलिओ दिनानिमित्त मेहकर शहरातील जानेफळ चौक येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसमवेत ५ वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचा उपक्रम संपन्न झाला.
प्रत्येक पालकाने आपल्या ५ वर्षांखालील बालकाला राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेणे, हे निरोगी आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे योगदान आहे. पोलिओ विरुद्धची लढाई ही केवळ शासनाची नव्हे, तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
पोलिओमुक्त भारताचे यश अबाधित ठेवण्यासाठी जनजागृती, नियमित लसीकरण आणि प्रत्येक बालकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक बालक निरोगी असेल, तरच भारताचे भविष्य अधिक सक्षम आणि सुरक्षित बनेल.
यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक श्री.दिलीपराव देशमुख,मेहकर शिवसेना तालुका प्रमुख श्री.सुरेशतात्या वाळुकर,संरपच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री.अरूण दळवी,डॉ.धैर्यशिल रहाटे,श्री. सुरेश औदगे,श्री.सागर कडभणे,श्री.अमोल कंकाळ यांच्यासह मेहकर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी वृंद,अधिपरिचारिका, अंगणवाडी सेविका आणि नागरिक उपस्थित होते…..✒️



