विदर्भ

श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात संविधान दिन साजरा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम ; दिनांक 26 नोव्हेंबर 2024 वार : मंगळवार ला श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशीम येथे 26 नोव्हेंबर, “संविधान दिन” हा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संविधानातील उद्देशिकेचे वाचन हे करण्यात आले.मा.प्राचार्य.डॉ.संजय साळीवकर यांनी या वेळेस सर्व उपस्थितांना संविधानाचे महत्व पटवून दिले संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार व हक्क याबाबत मार्गदर्शन केले. श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व शिक्षक आमदार ऍड.श्री.किरणराव सरनाईक व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.डॉ.श्री.स्नेहदीपदादा सरनाईक यांनी संविधान दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button