तलाठी एसीबीच्या जाळ्यात आठ ते दाह हजार लाचेची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव, येथे ८ ते १० हजाराच्या लाचेची मागणी
केल्याप्रकरणी बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई करून २१ मे रोजी दुपारी तलाठ्याला ताब्यात घेतल्याची घटना शेगावातील वाटीका चौक येथे उघडकीस आली. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील तलाठी पंजाबराव भगवान जाधव (४९) यांचेकडे आस्वंद येथील एका शेतकऱ्यांने त्याच्या आत्याभावाला विक्री केलेल्या शेतजमीनीच्या सातबाऱ्यावर नाव चढविण्यासाठी अर्ज केला होता. यावेळी तलाठी पंजाबराव जाधव यांनी सदर शेतकऱ्याकडे सातबाऱ्यावर नाव चढवण्यासाठी १० हजाराची लाचेची मागणी केली होती. दरम्याने शेतकऱ्यांने याबाबत १३ मार्च २०२४ रोजी बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारीवरून बुलडाणा लाचलुचपत
खामगाव जावृत्ती
विभागाच्या टिमने १३ मार्च २०२४ रोजी लाचमागणी पडताळणी कार्यवाही केली असता तलाठी पंजाबराव जाधव यांनी जडजोडअंती ८ हजाराची लाचेची मागणी केली. व सदर रक्कम शेतकऱ्याला २१ मे रोजी तात्काळ शेगाव शहरातील गौलखेड रोड वरील वाटीका चौकात आणण्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी २१ मे रोजी सापळा रचून पाळत ठेवली होती. दरम्यान आरोपी तलाठ्याला सदर शेतकऱ्यावर संशय आल्याने त्याने पैसे स्विकारले नाही. यावेळी घटनास्थळी तलाठी पोहचताच लाचलुचपत विभागाच्या टिमने तलाठी पंजाबराव जाधव यास ताब्यात घेवून त्यांचेविरूध्द लाच मागणीबाबत शेगाव शहर पोस्टेमध्ये कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शेगाव शहर पोलिस करीत आहेत.



