१० मार्च रोजी आ. नितीन देशमुख यांच्या हस्ते होणार हिगंणि बु. येथे अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी अकोला
तेल्हारा, दि.९ मार्च २०२५ :
हिंगणी बुद्रुक येथे स्व.आशाताई पोहरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जगदंबा क्रीडा मंडळाच्या वतीने १० मार्च रोजी सायंकाळी ७:०० वाजता कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू विनायक माळी राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ. साजिद खान पठाण, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे , महेश गणगणे , मंगेश काळे, तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे, संजय अढाऊ, गौरव राऊत , हिवरखेडचे ठाणेदार गजानन राठोड हे राहणार आहेत या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस -५५५५५ , द्वितीय बक्षीस -३३३३३, तृतीय बक्षीस- २२२२२ आदित्य पोहरे यांचे कडून राहणार आहे. प्रवेश फि ७०१ रुपये राहिल या निमित्ताने उपस्थित मान्यवरांचा आयोजकां कडून सन्मान करण्यात येईल तरी कबड्डी संघ यांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन जगदंबा क्रीडा मंडळाच्या वतीने याप्रसंगी करण्यात आले आहे.



