Uncategorized

शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी! अक्षय तृतीयेच्या दिवशीच तुफानी वादळाने झोडपले. शेकडो एकरावरील पपई व केळीच्या लदबदलेल्या फळबागा भुईसपाट!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

हिवरखेड ; अक्षय तृतीया च्या शुभ मुहूर्तावर दि. १० मे शुक्रवार रोजी रात्री तुफानी वादळाने हिवरखेड सह झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपुर नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना झोडपले. त्यामुळे आज अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मराठी संस्कृतीतील पवित्र सण अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर सकाळी सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला परंतु त्याच दिवशी म्हणजे दि १० मे शुक्रवार रोजी रात्री तुफानी वादळाने हिवरखेड सह झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपुर नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना झोडपले. ज्यामध्ये शेकडो एकरावरील पपई व केळीच्या लदबदलेल्या फळबागा भुईसपाट झाल्या असल्याचे चित्र आहे त्यामुळे पवित्र सणाच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाल्याचे दुर्दैवी चित्र हिवरखेड सह विविध गावामध्ये आहे.

अक्षय तृतीयेच्या संध्येला अवकाळी वारा-ऊधानाने तुफानी वादळाच्या स्वरूपात हिवरखेड परिसरात धाव घेतली अवकाळी फक्त पावसाच्या स्वरूपात न येता प्रचंड वारा उधान, मेघगर्जना, विजांचा कडकडाट ,आकाशातील काळोख, वावटी, अशी अनेक संकटे सोबत घेऊन आला. वादळाची तीव्रता इतकी होती की मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले. अनेक घरांची पडझड झाली, आणि घरांवरील टीन पत्रे उडून गेली, घरांवरील टीन पत्रे इतक्या जोमाने धडधडत होती की लहान मुलांनाच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांच्या मनात सुद्धा एकच धडकी भरली. वादळाला जे जे समोर दिसत होते ते सर्व नेस्तनाबूत करीत गेला. रात्रीची वेळ असल्याने झालेल्या नुकसानीची पूर्णपणे माहिती मिळू शकली नाही परंतु
संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी, अशा अनेक फळ भाजीपाला धान्य व विविध पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानी व्यतिरिक्त अनेक वृक्ष ऊन्मळून पडली. अनेक कच्च्या घरांचे नुकसान झाले. त्यामुळे शासकीय स्तरावरून तात्काळ पंचनामे करून मदत मिळणे अपेक्षित आहे.

अशातच महावितरण चे विद्युत खांब सुद्धा कोसळले, त्यामुळे महावितरणची बत्ती गुल झाली.
अक्षय तृतीयेला आलेल्या प्रचंड तुफानी वारा उधाणाने अनेक वृक्ष कोलमडली, अनेक गावातील विद्युत खांब कोसळले, त्यामुळे महावितरण ची बत्ती गुल्ल होऊन सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. आधीच तप्त उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नेहमीप्रमाणे पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक तास महावितरण ची बत्ती गुल्ल झालेली बत्ती परत कधी येणार याची वाट नागरिक बघत होते.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button