भुरटे चोर पोलिसांच्या जाळ्यात मुक्ताईनगर

प्रतिनिधी धनराज मांडवकर भुरटे चोर पोलिसांच्या जाळ्यात मुक्ताईनगर शहरातील हरताळा येथील शेतकरी रामदास वेडूजी मुलांडे राहणार हरताळा यांचे शेत गट क्रमांक 121 ( अ ) यांच्या बांधावरील लोखंडी नांगर अंदाजे वजन एक क्विंटल तीस किलो चा नांगर दिनांक28/06/2223 रोज काही भुरट्या चोरांनी ट्रॅक्टरला लावून वरणगावच्या दिशेने जात असताना रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग साठी जाणारी पोलीस वाहन चालक यांना शंका आली असता त्यांनी काही उलट्या चोरांना रस्त्यावरील दिशा फलक खुणा काढताना पकडले असता त्यांच्याकडून एक लोखंडी नांगर ट्रॅक्टर सह सापडला ही कारवाई वरणगाव पोलिसांचे असून त्यांनी मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग केली आहे दिशा फलक काढताना आणि ट्रॅक्टरला लावलेला नांगर हा चोरीचा आहे असे निष्पन्न झाले असता मुक्ताईनगर पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद केले आहे ही घटना दिनांक 30 /06/2023 रोजी रात्री 12;30 वाजता पेट्रोलिंग दरम्यान पकडलेल्या आरोपींची नावे अशा प्रकारे आहेत1 ) मुकेश सोनवणे वय34 वर्ष2 ) तुषार शिंदे वय323 ) गौरव देवगिरी वय 204 ) रोशन कहार वय 30सर्व राहणार फुलगाव यांना मुक्ताईनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे तरी यांच्याकडून अजून काही चोऱ्यांची माहिती किंवा गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे तरी पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे



