जे ई स्कूल आणि ज्यू कॉलेज मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन:-

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी प्रमोद सौंदडे
सविस्तर वृत्त असे की सालाबादाप्रमाणे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम निमित्त आज आनंदोत्सवा च्या पहिल्या दिवशी शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये उंचउडी ,लांबउडी, थाळीफेक, गोलाफेक, रनिग,रीले तथा मुलांचा क्रिकेट सामना सारख्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वेगवेगळ्या खेळात सहभागी होऊन मुलांनी मनसोक्त आनंद घेतला.या आनंदोत्सवाचे स्वरूप आणि माहिती सांस्कृतिक मंडळचे अध्यक्ष एस आर ठाकूर यांनी सांगितले,नंतर मुलांच्या उपस्थितीत प्राचार्य एन पी भोंबे यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धांना सुरुवात झाली प्रसंगी क्रीडा शिक्षक एस एम वाढे, एस जे मोरे, एम आर चौधरी,बी एम कोल्हे,ए एम खडसे,एस आर महाजन पर्यवेक्षक तथा सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



