
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
विदर्भ ब्युरो चिप
शेगाव । शिल्लक कारणावरून जबदरस्तीने चारचाकी वाहनात बसवून लाकडी काठी व पट्ट्याने एका मारहाण केल्याची घटना जगदंबा चौक परिसरात ६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता घडली. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत फिर्यादी सौ. सुषमा विजय पाँदे वय ३५ रा.व्यंकटेशनगर शेगाव यांनी पोलिसांत फिर्याद दिली की, आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या
पतीस जबरदस्तीने चारचाकी गाडीत डांबून नेले व लाकडी काठीने व कमरपट्ट्याने मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून व मेडीकल सर्टिफिके टवरून शहर पोलिसांनी आरोपी विशाल गजानन जाधव, प्रमोद गजानन जाधव, रोहन अरूण चौके, अक्षय अरूण चौक व इतर ३
ते ४ लोक सर्व रा. शेगाव यांचेविरूध्द कलम १३७ (२), १८९ (२), १९०, १९१ (२), ११८ (१), ३५२, ३५२ (२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि सोनटक्के हे करित आहेत



