महाराष्ट्रराजकीय

मुक्ताईनगर मध्ये सुषमाताई अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेचे लावलेले बॅनर फाडले

अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल:-( तालुकाप्रतिनिधी प्रमोद सौंदळे)सविस्तर वृत्त असे की दिनांक 4/11/2022 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे यांची जिल्हा घरातील पाच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात महाप्रबोधन यात्रेनिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने मुक्ताईनगर मध्ये या सभेची युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांच्या नेतृत्वात सभेची जोरदार पूर्वतयारी सुरू होती सुषमाताई अंधारे यांच्या आधीच्या झालेल्या सभांमध्ये झालेली गर्दी तसेच विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलेला होता त्यामुळे मुक्ताईनगरच्या सभेमध्ये सुषमाताई अंधारे यांच्या भाषणाची मुक्ताईनगर तालुक्या सह जिल्हाभरातील जनतेचे लक्ष लागून होते परंतु सभेच्या एक दिवस आधी जिल्हाधिकारी जळगाव यांनी सभेची परवानगी नाकारल्यामुळे सभा होऊ शकली नाही. परंतु या सभेसाठी संपूर्ण शहरांमध्ये होर्डिंग बॅनर लावण्यात आलेले होते या बॅनर पैकी एसटी बस डेपो जवळील रोडच्या कडेला लावण्यात आलेले माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे महाप्रबोधन यात्रा प्रचारार्थ लावलेले बॅनर दिनांक 5/11/2022 च्या रात्री 11 ते 11:45 च्या दरम्यान अज्ञात इसमाने फाडून नुकसान केले म्हणून अज्ञाता विरोधात भादवि कलम 427 तसेच 500 प्रमाणे मुक्ताईनगर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button