बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दि. १३ मार्चपासून ढगाळ वातावरण वाढण्यास सुरुवात होईल

दि. १३ मार्चपासून ढगाळ वातावरण वाढण्यास सुरुवात होईल

दि. 15 तारखेला बुलढाणा घाटाखाली लगतच्या धामणगाव बढे, मोताळा, फुली, पिंपळगाव राजा, नांदुरा, खामगाव, आणि शेगाव च्या दक्षिणेकडील भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. यादिवशी संध्याकाळी ५ वाजेपासून रात्री ८ पर्यंत शेगाव, जलंब, नांदुरा, आसलगाव, जळगाव जामोद, टूनकी, बावनबीर, संग्रामपूर, तेल्हारा, हिवरखेडे या संपूर्ण परिसरात विजेच्या कडकडाटा सह वादळी वाऱ्यासोबत पावसाची शक्यता आहे. दि. १५ मार्चला संध्याकाळी खामगावच्या दक्षिणेकडील विहीगाव या परिसरात विजेच्या कडकडाटा सह वादळी वाऱ्यासोबत पावसाची शक्यता आहे. दि. १६ मार्चला संध्याकाळी ४ वाजेपासून खामगाव, अमडापूर मार्गावर असलेल्या हिवरखेड, लोखंडा या परिसरात विजेच्या कडकडाटा सह वादळी वाऱ्यासोबत पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. ह्या पावसाचा पट्टा पुढे थोडेसे उग्र रूप धारण करून सरकत खामगाव, शेगाव,जलंब, पातुर्डा, मडाखेड, जस्तगाव, संग्रामपूर पर्यंत विजेच्या कडकडाटा सह वादळी वाऱ्यासोबत पावसाची शक्यता आहे. या दरम्यात हवेचा वेग २० ते २५ किमी प्रती तास राहण्याची शक्यता आहे. दि. १७ मार्चला संध्याकाळी ४ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत बुलढाणा घाटाखालील भागात म्हणजे मोताळा, मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, रावेर, सावदा पर्यंत तसेच मुक्ताईनगर, बोदवड चा पलीकडे जामनेर पर्यंत या संपूर्ण भागात विजेच्या कडकडाटा सह वादळी वाऱ्यासोबत हलक्या किंवा साधारण स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात घाटावर चिखली, मेहकर, लोणार, जालना , देऊळगाव राजा, सिल्लोड, अजिंठा तसेच कन्नड, चाळीसगाव, पाचोरा, नालेगाव, मनमाड, येवला, साक्री, पारोळा या परिसरात विजेच्या कडकडाटा सह वादळी पावसाची शक्यता आहे. या भागात खूप नुकसानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. दि. १८ तारखेला संध्याकाळी ५ ते रात्री ८ वाजेदरम्यान बुलढाणा, चिखली, खामगाव या पट्ट्यात विजेच्या कडकडाटा सोबत वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच रात्री ९ वाजेच्या आसपास खामगाव, तेल्हारा, जळगाव जामोद, मलकापूर या परिसरात हलक्या स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता आहे. एकंदरीत या तीन ते चार दिवसात वाऱ्याचा वेग अगोदर सांगितले प्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या काढणीस आलेल्या पिकाची योग्य ती काळजी घेऊन किंवा पूर्व नियोजन करून होणारे पिकाचे नुकसान होता होईल तेवढे टाळण्याचा प्रयत्न करावा. भागानुसार सांगितलेल्या वेळेमध्ये १ ते २ तासाचा मागे पुढे फरक पडू शकतो. शेवटी भाकीत आहे वेळेवर या मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. वातावरणामध्ये काही बदल झाल्यास त्याची अद्यायावत माहिती वेळो वेळी प्रसारित किंवा सादर केली जाईल……….( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button