जिल्ह्यातील पहिल्या अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ महिला जिम’ चे लोकार्पणआंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू स्नेहा कोकणे पाटील यांची उपस्थिती

स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा प्रतीनीधी रामा इंदोरे
खामगाव : बुलढाणा जिल्ह्यातील फक्त महिलासांठी असलेल्या पहिल्या ‘राजमाता जिजाऊ महिला जिम’ चे लोकार्पण आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू स्नेहा कोकणे पाटील, सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी २४ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले
आमदार आकाश फुंडकर यांच्या संकल्पनेतून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर २ कोटी रु. किमतीच्या ही भव्य वास्तू निर्मित करण्यात आली आहे. यात अत्याधुनिक जिम इक्विपमेंट्स, चेंजिंग रूम, लॉकर्स, फ्रिज, प्रशस्त योगा हॉल, हवेशीर वातावरण अशा सुविधा आहेत.
राजमाता माँ जिजाऊंच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात महिलांच्या आरोग्याला बळकटी देण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होऊन ऑलंपिक सारख्या स्पर्धांमध्ये आपल्या देशाचा सन्मान वाढावा या विचारांनी बुलढाणा जिल्ह्यात सर्वप्रथम खास महिलांसाठी तब्बल १ कोटी ५१ लक्ष रुपयांची इमारत व ५० लक्ष रुपयांचे व्यायाम साहित्य असा २ कोटी रुपयांचा निधी खर्चून भव्य ‘राजमाता जिजाऊ महिला जिम’ खामगांवात उभारल्या गेला आहे.
लोकार्पण झाल्यानंतर स्नेहा कोकणे पाटील यांनी आमदार फुंडकर यांच्या महिला भगिनींसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. खऱ्या अर्थाने माँ जिजाऊंच्या मातृतीर्थ जिल्ह्याचा आपण सन्मान वाढविला आहे . मुली व महिलांना आत्म सुरक्षेसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी आपण मला भविष्यात यासाठी बोलवा मी मी कधीही तयार राहील. शासकीय स्तरावर अशा पद्धतीचे महिलांसाठीच्या जिम चे कार्य महाराष्ट्रात मी पहिल्यांदाच बघत आहे. शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी याचा आपल्या आरोग्यासाठी उपयोग करावा असेही आवाहन त्यांनी केले.



