जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढोरपगांव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :गजानन तांगडे खामगांव
खामगांव तालुक्यातील ढोरपगांव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने 1 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राज्यभरात लेखन प्रेरणा दिन म्हणून घोषित केला आहे. यांचा जन्म ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि दलित साहित्य चळवळीत महत्वपूर्ण योगदान दिले. फकीरा ही त्यांची गाजलेली कादंबरी असून त्यांना मराठी साहित्यात आणि लोककलेत अनन्यासाधारण स्थान आहे. त्यांची ही जयंती सर्व महाराष्ट्रभर साजरी होत असताना अशी जयंती खामगाव तालुक्यातील ढोरपगांव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला हार आणि पुष्प अर्पण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या जयंतीनिमित्त शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष सदस्य भालेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षिका सर्व मान्यवर उपस्थित होते



