जळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्र

भरधाव डंपरची धडक; दोन आदिवासी युवकांचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

— चालक–मालक कोण? गोरगरिबांना न्याय मिळणार का, की ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’?
प्रतिनिधी | मुक्ताईनगर
मुक्ताईनगर–बऱ्हाणपूर रोडवरील इंदूर ७५३ रस्त्याच्या कामादरम्यान भरधाव डंपरने मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोन आदिवासी युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १२ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मुक्ताईनगर स्मशानभूमीजवळ घडली. मृतांमध्ये राजकुमार गोपाल बारेला (१८) आणि राहुल गणपत ठाकूर (१६, दोन्हे रा. जुना पिंपरी रोड, मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. शेतीचे काम आटोपून ते एमपी.६८-झेडडी ८१६० क्रमांकाच्या मोटरसायकलने घरी जात असताना चुकीच्या दिशेने आलेल्या डंपरने त्यांच्या गाडीला भीषण धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबर होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दोघेही मुळचे आदिवासी समाजातील असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. दरम्यान, डंपरवर रक्ताचे डाग नाहीत, या कारणावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. चालक आणि मालक नेमके कोण, ते सापडतील का, गोरगरिबांना न्याय मिळेल का की ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याची वेळ येईल, असा संतापजनक प्रश्न नागरिकांमध्ये उठू लागला आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई करून खरा चालक आणि मालकाला तातडीने ताब्यात घ्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, मृत युवकांच्या कुटुंबीयांनी न्याय न मिळाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button